मी पण आम आदमी
This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.
कृपया मला फेसबुकवर फॉलो करा आणि माझ्यासोबत येऊन बदल घडवा
आपल्याला माझे काम आवडले असेल तर कृपया हे पेज शेअर करा
'आप'चा जन्म
एप्रिल २०११ मध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात मोठ्या भ्रष्टाचाराचे घोटाळे उघडकीस आले आणि त्याच पार्श्वभूमीवर एका लोकचळवळीचा जन्म झाला. यानिमित्ताने अनेक दशकांपासून संसदीय समित्यांमध्ये अडकलेला 'जनलोकपाल विधेयक कायदा' लागू करण्याची मागणी करण्यासाठी विविध स्तरातील कार्यकर्त्यांचा एक गट एकत्र आला होता. बातम्या आणि माध्यमांमधून भ्रष्टाचार उघडकीस होत असल्याने दिवसेंदिवस जनक्षोभ वाढत होता आणि त्यामुळेच भ्रष्ट राजकीय व्यवस्थेवर वचक बसावा यासाठी कठोर कायदा असावा, या मागणीला सामान्य भारतीयांकडून व्यापक पाठिंबा मिळाला. जनलोकपालला ताबडतोब मंजूर करावे अशी मागणी करत 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'च्या बॅनरखाली त्यावेळच्या सरकारच्या विरोधात भारतीय लोक उठले होते.
शेकडो शहरे आणि खेड्यांमध्ये दोन वर्षांच्या कालावधीत लाखो लोक या उद्देशाने एकत्र आले. निषेध मोर्चे, राजकारण्यांना घेराव, सोशल मीडिया कॅम्पेन अशा चौफेर मार्गांनी क्रांतीची सुरुवात झाली होती. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली, जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आणि लोकांच्या मागणीवर कारवाई करावी, यासाठी सरकारवर दबाव आणण्याकरिता अनेक ठिकाणी हजारो लोक तीन वेगवेगळ्या प्रसंगी उपोषणाला बसले. तिसऱ्या आणि शेवटच्या उपोषणाच्या शेवटी, 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'च्या सर्व प्रयत्नांनंतरही संसद जनलोकपाल पास करू शकली नव्हती.
लोकांच्या मागण्या मान्य करण्यात सरकारचे अपयशी होणे, हा तर खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराचा परिणाम होता, आणि याच भ्रष्टाचाराने भारताच्या राजकीय व्यवस्थेचा ऱ्हास केला होता. जनलोकपाल हे राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या छुप्या हेतूंसाठी थेट मारक होते. तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'च्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने ठरवले की या देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राजकारणात सामील होणे, सरकारमध्ये प्रवेश करणे आणि व्यवस्थेला आतमधून स्वच्छ करणे. अशा प्रकारे २ ऑक्टोबर २०१२ रोजी 'आम आदमी पार्टी' नावाच्या राजकीय क्रांतीकडे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा प्रवास सुरू झाला.
'आप'ले पक्षचिन्ह
२०१२ साली 'आम आदमी पक्षाने' राजकारणात प्रवेश केल्यानंतर 'आप' हा भारतातील हजारो मान्यताप्राप्त, नोंदणीकृत पक्षांपैकी एक बनला. १ ऑगस्ट २०१३ रोजी निवडणूक आयोगाने पक्षाला निवडणूक चिन्ह बहाल केले. मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘झाडू’, ‘मेणबत्ती’ आणि ‘नळ’ ही सर्वाधिक पसंतीची चिन्हे म्हणून सबमिट केल्यानंतर, पक्षाच्या ‘झाडू’ या चिन्हाला पक्ष चिन्ह म्हणून घोषित केले गेले.
त्यादिवशी पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “यासह, पक्षाने देशाचे राजकारण स्वच्छ करण्याचा (पक्ष नोंदणीनंतर) दुसरा टप्पा पार केला आहे. पक्षाला आशा आहे की, श्रमाच्या प्रतिष्ठेचे प्रतीक असलेल्या झाडूने, आपले सरकार आणि आपल्या विधिमंडळात पसरलेली घाण साफ करण्यात येईल. देशातील मुख्य प्रवाहात असलेल्या भ्रष्ट राजकीय पक्षांचा सफाया करण्याची गरज आहे.”
३ ऑगस्ट २०१३ रोजी अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते नवी दिल्लीतील वाल्मिकी कॉम्प्लेक्समध्ये आम आदमी पक्षाचा 'झाडू' अधिकृतपणे लॉन्च करण्यात आला. लोकार्पण प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, “आम्ही या पवित्र भूमीपासून आपला प्रवास सुरू करत आहोत आणि मला खात्री आहे की या झाडूने आपण समाजाला स्वच्छ व शुद्ध करू शकू. यासोबतच आज देशाची आणि त्यातील राजकारणाची साफसफाई सुरू झाली आहे.
पक्षाचे स्वयंसेवक आणि समर्थकांसाठी झाडू हे केवळ निवडणूक चिन्ह नसून, देशातील व्यवस्थेला भ्रष्टाचार, जातीयवाद, गुन्हेगारीकरण आणि राजकारणातील दुष्कृत्यांपासून स्वच्छ करण्याच्या वचनाचे प्रतीक बनले आहे. अल्पावधीतच 'आप'च्या झाडूला जनमानसात स्थान मिळाले आणि देशभरातून सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या चिन्हाचा मानही या चिन्हाला मिळाला!
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
हो हे सगळं शक्य आहे!
सखोल अभ्यासाच्या जोरावर आणि खंबीर नेतृत्वात आपण हे सगळं शक्य करून दाखवणार.
आवाहन
चिंचवड विधानसभा मतदार संघातील विचारवंत, जाणकार, बुजूर्ग, युवा - युवती, माता - भगिनी आणि भ्रष्टाचारमुक्ती भयमुक्तीची आस धरणाऱ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो... मी चेतन गौतम बेंद्रे.. आम आदमी पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून तुम्ही ओळखता.. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मी 'आप' कडूनच निवडणूक रिंगणात उतरणार आहे. माझी पार्श्वभूमी, माझे मनोगत, आणि माझा दृष्टिकोन याचा सारासार विचार करून आपण खंबीरपणे साथ द्याल, हीच अपेक्षा आहे. माझा पक्ष प्रामुख्याने भ्रष्टाचारमुक्ती आणि भयमुक्तीसाठी देशभर लढत आहे, हे आपल्याला माहीत आहेच. आदरणीय अरविंदजी केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी अल्पावधीत दिल्ली आणि पंजाब येथील विधानसभा जिंकून अत्यंत लोकोपयोगी सरकारे तेथे कार्यरत आहेत, त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वर वर चढत आहे, हे वेगळे सांगायला नको. भारतीय जनता पार्टी प्रणित 'एन डी ए' भ्रष्टाचारामध्ये, हुकूमशाही आणण्यामध्ये आणि संविधानाची छेडछाड करण्यामध्ये मश्गुल आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रणित 'इंडिया' आघाडी परिवार वाद, देशद्रोह्यांची साथ आणि विकासाचा अजेंडा न देता फक्त सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात गुंतली आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी 'आम आदमी पार्टी' मैदानात उतरली असून तिची धोरणे आणि लोकप्रियता वाढत चालली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरत आहे. इतरांना संधी देऊन झाली, यावेळी मला भक्कम साथ द्या ! .
मी चेतन गौतम बेंद्रे :
साहजिकच, तुमच्या मनात पहिला प्रश्न येणार की मी कोण? मी चेतन गौतम बेंद्रे. नुकतीच चिंचवडचा चेतन नावाची वेबसाईट लॉन्च केली आहे. त्यात सर्व ती माहिती दिली आहेच. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असताना सामाजिक उद्देशाने 'आप' सोबत जोडला गेलो. गेल्या आठ वर्षात मी या राजकीय पक्षाच्या रूपाने समाजकारण आणि विकास करीत आहे. देशाच्या राजकारणातील 'आम आदमी पार्टी' ची सुरुवात आणि दिल्लीत मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांना जनतेने दिलेले पाठबळ संपूर्ण देश जाणतो. पारदर्शी आणि लोकाभिमुख शासन कसे असावे? हे केवळ 'आम आदमी पार्टी' ने दाखवून दिले आहे. तोच अजेंडा पुढे घेऊन जाण्याचे काम माझ्यासारखे हजारो तरुण सध्या देशात करत आहेत. म्हणूनच आपल्यासारख्या सूज्ञ जनतेचे चांगले समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचे १४५ ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सात ग्रामपंचायतींमध्ये 'आप' सत्तेवर आहे. पिंपरी - चिंचवड परिसरात देखील 'आम आदमी पार्टी' सातत्याने समाजाभिमुख काम करत आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक देखील लढवण्याची तयारी 'आप' ने केली आहे. केवळ आणि केवळ 'आम आदमी पार्टी' च आपल्या शहराला स्वच्छ, पारदर्शी, लोकाभिमुख, भ्रष्टाचार रोखणारे नगरसेवक देणार आहे आणि त्यासाठीच आपला आशीर्वाद अतिशय महत्त्वाचा आहे.
पिंपरी - चिंचवड चा विकास हाच अजेंडा !
गेल्या काही वर्षात पिंपरी - चिंचवड परिसराची अत्यंत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः, कारखाने आणि कामगारनगरी बरोबरच आता आपली 'मेट्रो सिटी' अशी ओळख अवघ्या जगाला होऊ लागली आहे. राज्यातील आणि देशातील अनेक भागातून आलेले नागरिक येथे स्थिरावले आहेत आणि रोजीरोटीसाठी रोजच नवीन कामगार पिंपरी चिंचवडच्या दिशेने धाव घेत आहेत. तथापि, त्यांचा सारासार विचार करता त्यांच्यासाठी नियोजन, योजना किंवा प्रकल्प आणले जात नाहीत. त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे काहीच दूरदृष्टी नाही, ही वस्तुस्थिती आहे. श्रीमंत महानगरपालिका असूनही इतक्या वर्षात पिंपरी - चिंचवडमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे एकही स्मारक उभे राहू शकलेले नाही, यासारखे दुसरे दुर्दैव काय? दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित प्रश्न उग्र रूप धारण करीत आहेत. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोनसारख्या महत्वपूर्ण प्रश्नांवर निवडणुका होऊन अनेक जण जिंकले, विधानसभेत गेले. पण, पुन्हा त्यांनी या प्रश्नावर चकार शब्द सुद्धा काढलेला नाही. प्रस्थापित राजकीय पक्षांनी या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याचे घोंगडे भिजत ठेवून नेहमीच ते भांडवल पुढे करण्याचे काम या मोठ्या पक्षांनी केले आहे. आता त्यांच्या विळख्यातून सुटका करून घेणे, नागरिकांसाठी गरजेचे आहे. ज्या शहराला २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न वारंवार दाखविले जाते, त्या शहरात दररोज नियमित पाणीपुरवठा होणे देखील दुरापास्त झाले आहे. 'अनियमितता' हा पाणीपुरवठ्याचा परवलीचा शब्द झाला असून सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत, त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे! शहरात बीआरटी सारखा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरला आहे. निगडीपर्यंत मेट्रोची मागणी असूनही जाणून-बुजून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशा प्रकारचे मोठे प्रश्न आणि हे इतर छोटे छोटे प्रश्न घेऊन तसेच अन्य प्रश्नांचा सारासार विचार करून त्यावर तोडगा काढण्यासाठी 'आम आदमी पार्टी' पिंपरी- चिंचवड मधील नागरिकांच्या समोर येत आहे.
'स्मार्ट सिटी' साठी प्रामाणिक प्रयत्न..
पुण्याप्रमाणेच पिंपरी - चिंचवड शहरांमध्ये 'स्मार्ट सिटी' प्रकल्प सुरू होऊन पाच वर्षाचा कालावधी उलटला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे कुरण मात्र वाढतच गेले. त्याचा फायदा शहराला नेमका काय झाला? हे समजत नाही. दुसरीकडे नगरसेवक मात्र मालामाल झाले. याच 'स्मार्ट सिटी' साठी अत्यावश्यक असलेली विद्युत यंत्रणा पाहिली तर तिची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ती चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी सध्याचे लोकप्रतिनिधी अतिशय विरक्त अवस्थेत गेले आहेत आणि हा प्रकल्प पूर्ण दुर्लक्षून काहीही करत नाहीत. आपले शहर स्मार्ट कसे होईल, याचा विचार केला जात नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करू या आणि प्राधान्य देऊ या.
विकास कामांच्या नावाने पैशाची उधळण!
पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांच्या नावाने सगळीकडे बिनधास्त पैशाची उधळण सुरू आहे. आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेतील काही उच्च पदस्थ अधिकारी यांच्या हट्टाहासामुळे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सर्रास सर्वत्र सुरू आहे, ते तुम्हाला दिसले असेलच. ते भ्रष्टाचाराचे मोठे घबाड असून दोन दोन वर्षे चालणाऱ्या अशा कामांमुळे त्या त्या भागातील नागरिक, व्यावसायिक, व्यापारी यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्याचप्रमाणे नदी सुधार प्रकल्प, आवास योजना यावर मोठा पैसा खर्च झाला आहे, पण निष्पन्न काय झाले आहे? त्या प्रकल्पांची वस्तुस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च होत आहे. पण, शहर स्वच्छतेच्या नियोजनात त्याचा परिणाम कोठेही दिसत नाही, ही झाली वस्तुस्थिती. ती अतिशय चिंताजनक असून आपल्याला आपले शहर भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे आणि त्यासाठी तुमचे पाठबळ हवे आहे.
आम आदमी पार्टी आणि माझे व्हीजन..
मतदार बंधू भगिनींनो.. तुम्हाला माहीत आहेच की नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोना संकटाच्या काळात फक्त कागदी घोडे नाचवून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. थोडे मनावर घ्या. याचे उत्तर आपण या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना आणि जनतेला देऊ या. हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. तथापि, शहरांमध्ये नागरिकांची वेगवेगळ्या करातून आणि शुल्काच्या जाचातून कशी सुटका करता येईल, याचा गांभीर्याने विचार करा. याचे उत्तर आम आदमी पार्टी आणि मी स्वतः शोधत आहे. त्यासाठी मला मोठी भूमिका घ्यावी लागणार आहे आणि त्यापासून हटणार मुळीच नाही. फक्त तुमचा पाठिंबा हवा आहे. आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना चांगल्या खासगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धावपळ होते. त्यांना आटापिटा करावा लागतो. त्यासाठी दिल्लीप्रमाणे शहरातील शाळा विकसित झाल्या, तर खासगी शाळांकडे पालकांचा असलेला ओढा आपोआपच कमी होणार आहे. पण, शिक्षणसम्राटांपुढे पायघड्या घालणारे आमचे राजकारणी आणि मोठे मोठे पक्ष हे घडू देत नाहीत, हे लक्षात घ्या. आपल्या शहरात सत्ताधाऱ्यांनी 'शाळा दत्तक योजना' जाहीर करून अक्षरशः बासनात गुंडाळून ठेवली आहे. रुग्णालये उभारून मोठमोठे ठेकेदार पोसण्याचे काम सुरू आहे. आपल्याला ते थांबवून गोरगरीब वर्गासह सर्वच नागरिकांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. 'मोहल्ला क्लिनिक' सारखी संकल्पना आपल्या शहरात चांगल्या प्रकारे राबवली जाऊ शकते, याबाबत ठोस कार्यक्रम राबवण्यासाठी आपला आम आदमी पक्ष आणि मी स्वतः आग्रही राहणार आहे.
शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य !
आपला पिंपरी- चिंचवड चा परिसर हा उद्योगांचे माहेरघर असल्याने उद्योगांना आणि येथील औद्योगिक वसाहतीला व्यवस्थित, अनुकूल वातावरण राहील, यासाठी प्रथम प्रयत्न करायला हवेत. शहरातील असंघटित कामगार आणि घरेलू कामगारांची संख्या फारच मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी जाहीर झालेल्या योजनांचा लाभ खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना मिळत नाही. त्यांना आर्थिक लाभ देणे आणि सोयी- सुविधांसाठी प्रयत्न करणे, हे काम मी प्राधान्याने करणार आहे. यासह महानगरपालिकेच्या माध्यमातून निराधार गरजूंसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्याचा आर्थिक लाभ देण्यास दरवर्षी विलंब होतो, तो टाळता येण्यासारखा आहे, त्यावर देखील आपल्याला लक्ष ठेवायचे आहे. तोही आपला प्राधान्याचा मुद्दा आहे. त्यासाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी डीबीटी ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माझा आग्रह राहील. महिला, युवकांना प्रशिक्षण आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय अनुकूल आणि योग्य अशी अभ्यासपूर्ण भूमिका 'आम आदमी पार्टी' च्या माध्यमातून घेतली जाईल. नव्याने विकसित झालेल्या भागात विशेषतः आयटी पार्क परिसरात सोयी सुविधांची वानवा आहे. तेथे सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण करणे गरजेचे आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करून तेथील कामगारांचे दैनंदिन जीवन सुसह्य आणि सुखकर करण्यासाठी निश्चित प्रयत्न होतील. या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज भासणार आहे, याचा विचार करून संबंधित कंपन्या आणि स्थानिक नागरिक यांच्याशी चर्चा करून आणि हा विषय हाताळून 'आम आदमी पार्टी ' जनतेसाठी सुखकर होईल, अशी भूमिका घेऊन काम करण्यास कटिबद्ध आहे.